छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अमृता आणि शुभंकर सध्या सन मराठी वाहिनीवरील 'कन्यादान' या मालिकेत नवरा बायकोच्या भूमिकेत झळकत आहेत. आता ते खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहेत.
साखरपुडयात अमृताने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर शुभंकरने फिकट हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कन्यादान मालिकेच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. साखरपुड्यानंतर शुभंकरने अमृतासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
शुंकरची पोस्ट Look test for 'कन्यादान'.. एक सुंदर मुंबई गर्ल माझ्या पत्नीच्या भूमिकेत काम करणार आहे म्हणून कॅरेक्टरचे फोटो आणि लूकच्या दृष्टीने 'तिला नवरा म्हणून मिठीत घे आणि होल्ड करा' असे दिग्दर्शकाने सांगितले..त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं ....जरी ती प्रोफेशनल गोष्ट असली तरीही कुठेतरी दोघांच्याही नजरेतून एक चमक पटकन येऊन गेली.. हि चमक अवघडलेपणाची होती का येणाऱ्या काळाचा इशारा देणारी होती हे मात्र त्या क्षणी लक्षात नाही आलं ...तरीही फोटो .. पोझ .. लूक हे सोपस्कार झाले !..This was our reel hug which was somewhat awkward for me!... आणि अशा तर्हेने आम्हा दोघांची somewhat awkward , happy , fresh & happening reel journey सुरु झाली !मग ह्या जर्नीमध्ये कामामुळे रोजच्या रोज भेटी , संवाद, वेगवेगळ्या इमोशनचे सीन्स आणि त्याबद्दल होणारा संवाद हे सगळं सुरु झालं !.. हि जर्नी एक एक स्टेशन घेत सुमारे 1 वर्ष 9 महिने अशीच चालू होती! अचानक एका station वर.. थोडी जरी संधी मिळाली तरी, एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी माझ्या मूळ गावाकडे म्हणजेच माझ्या पुण्याकडे पळणारा मी .. अरे धावपळ का करतोस असा माझ्या बाबा चा ओरडा खाणारा मी 2-3 दिवस सलग सुट्टी मिळूनही मुंबईतच थांबायला लागलो!... हे का झाले ..? तर 'कुछ बाते बस हो जाती है , और शायद इसे ही प्यार कहते हैं!' हे माझ्या लक्षात आले!... 'घाईघाईत पुण्याला येऊ नकोस'असं म्हणणारा माझा बाबा 'अरे 2 दिवस सुट्टी मिळून सुद्धा का नाही येतेस तू ..?' असं म्हणायला लागला ...कधीच कल्पनेच्या canvas वर नसलेलं चित्र माझं मन कधी नकळतपणे रंगवायला लागलं त्यात रंग भरू लागलं हे माझं मलाच समजलं नाही !.... ओळख तर रिअल जर्नीमध्ये झालीच होती पण आता हळू हळू खऱ्या मैत्री ला सुरुवात झाली!... त्यात कामा व्यतिरिक्त भेटी,कोणत्याही विषयावर अवांतर चर्चा , रात्री उशिरापर्यंत घरा जवळ कट्टा टाकणे , मुंबईतल्या वेगवेगळ्या स्पेशल जागांवर फिरणं , खूप व्हॅरायटीची खवय्येगिरी , नाटक , सिनेमा, कविता , गाणी, SRK वर असलेलं unconditional प्रेम , मराठा मंदिर मध्ये जाऊन ddlj चा show एकत्र बघणं , third wave coffee , cadbury crackle , little hearts, मरिन ड्राइव्ह , पुण्याची सफर , कुलाबा कोझवे , क्रॉफट मार्केट आणि बरंच काही ... हळू हळू मुंबईची लोकल ट्रेन जशी ट्रॅक हळुवारपणे change करते तसंच रिल जर्नीने सुंदर रिअल जर्नीचा ट्रॅक पकडला!... राज अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलटके देखेगी… और लड़की ने पलटकर देखा!
शुभंकर एकबोटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो चिठ्ठी, मंत्र, डार्कलाईट, कन्यादान , चौक, धर्मवीर अशा चित्रपट मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. तर अमृता बाणेबद्दल सांगायचं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात न्यूज रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रंग माझा वेगळा, जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून ती भेटीला आली आहे.