तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava) या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार(Amruta Pawar)ला खऱ्या आयुष्यात जोडीदार मिळाला आहे. इंजिनिअर असलेल्या नील पाटील याला अमृताने लाईफ पार्टनर म्हणून निवडला असून नुकताच तिचा साखरपुडा देखील पार पडला आहे. साखरपुड्याचे फोटो अमृताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
अमृता पवारचा नुकताच निल पाटील सोबत साखरपुडा पार पडला आहे. नील हा कलाविश्वात कार्यरत नसून तो इंजिनिअर आहे. त्याचा अमृताच्या अभिनयाला चांगला सपोर्ट असल्याचे ती सांगते. निलसोबत साखरपुड्याचे फोटो अमृताने शेअर केले असून साखरपुडामध्ये तिने नेसलेली जांभळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत आई बाबा आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेव्यतिरिक्त अमृताने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.