Join us

आरती सिंहची लगीनघाई! फुलांच्या माळांनी सजलं घर, गोविंदाची भाची चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:26 IST

लवकरच बोहल्यावर चढणार गोविंदाची भाची, आरतीच्या लग्नासाठी असं सजलं घर

'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंहची लगीनघाई सुरू आहे. आरती लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आरतीच्या लग्नासाठी संपूर्ण घर सजवण्यात आलं आहे. लग्नाच्या तयारीचे काही फोटो आरतीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

आयुष्यातील या खास क्षणासाठी आरती उत्सुक आहे. फोटो शेअर करत तिने लग्नासाठी घराची सजावट केल्याची झलक दाखवली आहे. लग्नासाठी आरतीचं घर पूर्णपणे सजलेलं दिसत आहे. घरात सगळीकडे फुलांच्या माळा लावल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. या फोटोत आरती नववधू्प्रमाणे नटल्याचं पाहायला मिळत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. हातात बांगड्या आणि केसांत गजरा माळत आरतीने खास लूक केला आहे. तिच्या चेहऱ्यावर ग्लो आल्याचंही पाहायला मिळत आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आरतीने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेमाची कबुली देत होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केला होता. दीपक चौहानशी लग्न करत आरती लवकरच नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आरती अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. डेस्टिनेशन वेडिंग न करता आरती मुंबईतच लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

टॅग्स :आरती सिंगकृष्णा अभिषेकगोविंदा