Join us

१८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - "माझी इच्छा आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 08:04 IST

Avika Gor : 'बालिका वधू' अभिनेत्री अविका गौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अविका गौर तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला डेट करत आहे, ज्याने अभिनेत्रीला काही काळापूर्वी प्रपोज केले होते.

बालिका वधू अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अविका गौर तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला डेट करत आहे, ज्याने अभिनेत्रीला काही काळापूर्वी प्रपोज केले होते. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळते आहे. यानंतर त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी गुपचूप लग्न केल्याचे सांगण्यात आले. पण आता अविका गौरने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या यूट्यूब शोमध्ये तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले.

अविका गौर म्हणाली, मिलिंद चंदवानी आणि मी चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत. तो आमच्या इंडस्ट्रीचा नाही. तो नोकरी करतो. याशिवाय त्याची एक एनजीओही आहे. आमचे नाते सुरू झाले तेव्हा आम्ही पहिले सहा महिने फक्त फ्रेंड झोनमध्ये होतो. आम्ही आमच्या नात्यात कधीही घाई केली नाही. नात्यात कधीही घाईघाईने निर्णय घेऊ नयेत, यावर आमचा विश्वास आहे. फ्रेंडझोनमध्ये राहिल्यानंतर ६ महिन्यांनी मिलिंदने मला प्रपोज केले.

ती पुढे म्हणाली, मिलिंद इतका छान आहे की मी त्याच्याशी मनातल्या मनात लग्न केले आहे. आजच त्याच्याशी लग्न करावंसं वाटतंय. पण मिलिंद म्हणतो की त्याच्या आणि माझ्या वयात खूप फरक आहे. त्यामुळे मी माझा पूर्ण वेळ त्यानुसार काढला पाहिजे. यानंतरच मी लग्नाचा विचार करू.

याआधी अविका गौर ससुराल सिमर का स्टार मनीष रायसिंघनला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र दोघांनीही याला अफवा असल्याचे म्हटले आहे. तर २०२० मध्ये या अभिनेत्याने संगीता चौहानशी लग्न केले, त्यानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :अविका गौर