Join us

"घरापर्यंत सोडू का?" पापाराझींनी विचारला प्रश्न; अभिनेत्रीने सुरक्षेविषयी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:34 IST

पापाराझी हे कल्चर सध्या सेलिब्रिटींसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी धोक्याचं झालं आहे.

पापाराझी हे कल्चर सध्या सेलिब्रिटींसाठी धोक्याचं झालं आहे. कलाकारांच्या प्रत्येक हालचालींवर पापाराझींचं लक्ष असतं. जिमबाहेर, एखाद्या कॅफेबाहेर आणि घराबाहेर तर हमखास पापाराझी असतातच. प्रत्येक जण सेलिब्रिटीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडत असतो. दरम्यान या सर्व पापाराझींमध्ये खरंच सगळे अधिकृत आहेत की नाही याचा कोणालाच पत्ताही लागत नाही. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी हे फारक धोक्याचं झालं आहे. बिग बॉस फेम अभिनेत्रीने हाच मुद्दा उचलून तिला आलेला अनुभव सांगत चिंता व्यक्त केली आहे.

'बिग बॉस १७' मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री आएशा खानने (Ayesha Khan)  इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "माझ्यावर प्रेम करण्यासाठी मी मीडियाचा आदर करते. मात्र या पापाराझींमुळे मला असहज वाटत आहे. घरापर्यंत सोडू का अशा कमेंट्स मला त्यांच्याकडून आल्या, कधी कारपर्यंत माझा पाठलाग केला तर कधी मला जायला जागाही दिली नाही आणि अजून बरंच काही. मी निरीक्षण केल्याप्रमाणे अशा कमेंट्स हातात केवळ मोबाईल घेतलेल्या लोकांकडून आल्या आहेत. हे खरोखरंच पापाराझी आहेत का याची ओळख कशी होणार? तसंच तुम्ही सेलिब्रिटी असल्याने काहीही झालं तरी नेहमी आदरानेच बोललं पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. कारण तुम्ही तुमच्या बचावाखातर काही बोललात तर तुम्ही उद्धट आहात आणि तुम्हाला प्रसिद्धी हँडल करताच  येत नाही असं ठरवलं जातं."

दरम्यान आयेशा खानच्या कामाबद्दल सांगायचं तर ती 'दिल को रफु कर ले' शोमध्ये दिसत आहे. तिने नुकताच सनी कौशलसोबतही एक प्रोजेक्ट केला. हा एक डिटेक्टिव्ह कॉमेडी प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये निम्रत कौर, मेधा शंकर यांचीही भूमिका आहे. पुढील वर्षी तो रिलीज होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार