'सिलसिला बदलते रिश्तों का' मालिकेतील या अभिनेत्रीला येते तिच्या घराची आठवण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:32 PM2018-07-16T14:32:50+5:302018-07-16T14:34:20+5:30
त्यामुळे छोट्या पडद्यावरील कलाकार कधी कधी आपल्या या खास आठवणींना वाट मोकळी करून देत असतात. अशीच एक खास गोष्ट आदिती शर्मानेही तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं होते निर्माण झाले असले तरीही आपल्या कुटुंबाची आठवण सतत कलाकारांना येत असते.त्यामुळे कधी कधी आपल्या या खास आठवणींना कलाकार वाट मोकळी करून देत असतात. अशीच एक खास गोष्ट आदिती शर्मानेही तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
'सिलसिला बदलते रिश्तों का' मालिकेमधील डॉ.मौली ही भूमिका साकारणारी अदिती शर्मा अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत.सरळ सुंदर अभिनयाने असलेल्या प्रेक्षकांना तिचे प्रेमळ पात्र भावले आहे.ऑनस्क्रीन पात्र आणि ऑफस्क्रीन अदिती मध्ये बरेच साम्य आहे आणि त्यातील महत्वाचा भाग म्हणजे ती लखनऊची आहे. लखनऊ असणाऱ्या अदितीला हे शहर खूप आवडते आणि त्या नवाबी भूमीत जाण्याची तिची इच्छा आहे. मात्र शूटिंगमुळे अदिती आणि तिचे पती सरवार आहुजा सध्या मंबईत रहात आहेत पण तिचे मन मात्र लखनऊमध्येच अडकले आहे आणि तेथील आठवणी तिने सांभाळून ठेवल्या आहेत.
तिने सांगीतले की तिला लखनवी गलौटी खाण्याची आठवण येते आहे आणि ती जेव्हा घरी जाणार तेव्हा हा स्वादिष्ट पदार्थांवर तिला खायचे आहेत. लखनऊ विषयी बोलताना, अदिती म्हणाली, “असे म्हणतात की जेथे घर असते तेथेच मन असते आणि माझ्यासाठी ते लखनऊमध्ये आहे.शो विषयी बोलताना, अदिती म्हणाली, “मौलीचे पात्र मला अतिशय आवडले. माझ्या आईवडिलांना मला डॉक्टर बनवायचे स्वप्न होते आणि या शोमध्ये मला एका गायनॉकॉलॉजिस्टची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे आणि मला विश्वास आहे की ते त्यांच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा आमच्यावर असाच वर्षाव करत राहतील.”