छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी'. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे , अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) ही अपूर्वाची भूमिका साकारते आहे.
ज्ञानदा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. अलीकडेच ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर तिचा ऑफ शोल्डर ड्रेसमधला फोटो शेअर केला होता. या फोटोतील तिच्या हास्यावर चाहते फिदा झाले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केलाय. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
ज्ञानदा कर्लसवरील 'सख्या रे' जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावे, ईअर डाऊन यासारख्या मालिकेंमध्ये तिने काम केले आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.