Join us

हेमांगी कवीच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 3:41 PM

Hemangi Kavi: हेमांगीच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असतानाही तिने नाटकाचा प्रयोग व्यवस्थित पार पाडला.

समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर उघडपणे भाष्य करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येत असते. हेमांगी कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवरही बऱ्याचदा भाष्य करत असते. यावेळी तिने शुटिंग सुरु असताना तिच्या पायाला झालेल्या दुखापतीविषयी एक अनुभव शेअर केला.

परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घालता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले.  काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.  पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली", असं हेमांगी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू  लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते. मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?  काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं.  पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. परकाया प्रवेशाची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारीरिक आणि मानसिक सुद्धा काही काही उरत नाही आपल्यात. या गोष्टीचा मला फायदा झाला.  प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं. या क्षेत्राची मला हीच गोष्ट आवडते. वेगवेगळी characters केल्यामुळे, करताना आपल्या वैयक्तिक दुखांमधून पटकन सावरता येत आम्हांला. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. तिने पुढे केलेला मदतीचा हा हात धरायचा की नाही हे आपल्या हातात असतं.  ‘जन्मवारीचा’ पहीला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील. कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर! 

टॅग्स :हेमांगी कवीसेलिब्रिटीटेलिव्हिजननाटक