जास्मीन भासीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम करून इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. 'जमाई राजा', 'दिल से दिल तक', 'दिल तो हॅपी है जी', 'नागिन', 'एक श्रृंगार स्वाभिमान' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. मालिकांबरोबर जास्मिन काही सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. सध्या सिनेसृष्टीपासून जास्मिन लांब असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच जास्मिनने एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तिने डिझायनर ड्रेस घातला होता. पण, फॅशन करायच्या नादात जास्मिनची फजिती झाली. या इव्हेंटमधील व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. ड्रेसमुळे जास्मिनला चालताही येत नसल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. "किती अनकंफर्टेबल दिसत आहे...तरीही शो ऑफसाठी काहीही करतात," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "ही कुठली फॅशन ज्यातून चालताही येत नाही", असं म्हटलं आहे. "असा ड्रेस घालण्याचा काय फायदा, ज्यातून चालताही येत नाही", "रस्ता साफ करण्याची मशीन" अशा कमेंटही केल्या आहेत.
मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवलेली जास्मिन 'बिग बॉस १४' मुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी ती एक होती. गेल्या कित्येक दिवसांपासून जास्मिन छोट्या पडद्यापासून दूर आहे. जास्मिन सध्या अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.