Join us

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीचं लग्न झालंय?, यावर अभिनेत्री म्हणाली - "गुगलवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 19:07 IST

Jui Gadkari : 'ठरलं तर मग'ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग(Tharala Tar Mag)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. लोकांना तिचे लग्न झालं आहे का, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यामुळे नुकतेच एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला.

जुई गडकरीने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अनेक फोटोंमध्ये जुई गडकरी मंगळसूत्र घातलेली दिसून येते. त्यामुळे लोकांना अभिनेत्रीचं लग्न झालंय असं वाटतं. याबद्दल ती म्हणाली की, मी मंगळसूत्र घातलेली दिसून येते. काही लोकांना कळून येत नाही की, मी तो फोटो ऑनसेट काढला आहे की बाहेर. ९० टक्के मी सेटवर असते. जर कधी प्रमोशनला गेले तर मंगळसूत्र लूकमध्येच असते. त्यामुळे लोकांना वाटतं की माझं लग्न झालंय. एवढचं नाही तर मला दोन मुलं आहे, असेही अनेकांना वाटतं.

अभिनेत्रीने चर्चांना लावलं पूर्णविराम

गुगलवरही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या अफवांना खतपाणी घालतात. त्यामुळे ज्या गोष्टीत तथ्य नसतं तेपण लोकांना खऱ्या वाटू लागतात. त्यामुळेच लोक मला विचारतात, तुझं लग्न झालं आहे का? की तुझा घटस्फोट झाला आहे? की तुला मंगळसूत्र घालायची लाज वाटते. अशारितीने जुई गडकरी हिने तिच्या लग्नाच्या आणि मुल असण्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे.

वर्कफ्रंट... सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत काम करताना दिसते आहे. तिला पुढचं पाऊल या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच तिने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता.   

टॅग्स :जुई गडकरीस्टार प्रवाह