झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नविन मालिका दाखल झाली. एका आठवड्यातच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत परीची भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली पाहायला मिळत आहे. परीचा निरागसपणा आणि तिचा समजूतदारपणा प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत नेहा आणि परीच्या घरा शेजारी एक जोडपे राहत असलेले दाखवले आहे. नेहा ऑफिसमध्ये गेल्यावर हे काका-काकू परीची काळजी घेताना दिसतात. काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने जवळपास ५ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर कमबॅक केले आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे मानसी मागिकर. याआधी तुम्ही त्यांना झी मराठी वाहिनीवर २०१४ ते २०१६ या कालावधीत प्रसारीत होणारी मालिका का रे दुरावामध्ये पाहिले असेल. याशिवाय त्या झी मराठीच्या २०१६ साली खुलता कळी खुलेना मालिकेतही पहायला मिळाल्या होत्या.
गोट्या या लोकप्रिय मालिकेत मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका अतिशय सुरेख साकारली होती. सहदिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून गोट्या मालिकेतून तसेच पुढचं पाऊल या चित्रपटातून दोघांनी एकत्रित काम केले होते. ‘एकाच या जन्मे जणू…’ हे लोकप्रिय गाणं पुढचं पाऊल या चित्रपटातील आहे. हे गाणे मानसी मागिकर यांच्यावर चित्रीत झाले आहे. लग्न पहावे करून, हुप्पा हुय्या, हापूस, घरकुल वेबसिरीज यातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले आहे. मानसी आणि विजय मागिकर यांना ‘वरुण’ हा एकुलता एक मुलगा आहे.