Join us

ही अभिनेत्री दिसणार जजच्या खुर्चीत, लग्नाच्या चर्चेमुळे होतेय ट्रोल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:15 IST

आपल्यापेक्षा वयाने 11 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला ती डेट करतेय.

टिव्हीवर लवकरच एक डान्स रिअॅलिटी शो सुरु होणार आहे. या शोचे नाव 'इंडियाज बेस्ट डान्सर' आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मलायका अरोरा दिसणार आहे. याशिवाय कोरिओग्राफर गीता कपूर, टेरेंस लुईससुद्धा परीक्षक म्हणून असणार आहेत.  रिपोर्टनुसार यात 12 मेन्टॉर असणार आहेत. जे आपल्या टीममधील स्पर्धकांना मार्गदर्शन करतील.

मात्र हा शो कधी सुरु होणार याबाबतची कोणतीच माहिती मिळालेली नाही. मलायकाने याआधी 'इंडियाज गॉट टॅलेंट'ची जज होती. नज बलिये,  जरा नचके दिया, झलक दिखला जा यासारख्या अनेक रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसली आहे. 

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत अफेअर असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. 

टॅग्स :मलायका अरोरा