मनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धोका आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.
अभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. चूक भूल द्यावी घ्यावी या तिच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सरस्वती या मालिकेची देखील निर्माती तीच आहे.
मनवान 2017मध्ये निर्माता सुशांत तुंगारेसह लग्नाच्या बेडीत अडकली. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्मात असून त्याने मालिकांची निर्मिती केली आहे. दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांनी उपस्थिती लावली होती. मनवाने सोशल मीडियावर अकाऊंटवर सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मनवा ही प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांची कन्या आहे.