सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनची नवीन मालिका कुछ रीत जगत की ऐसी है ही विचार प्रवर्तक मालिका आहे. या मालिकेत नंदिनीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिच्यात परंपरेची मुळे खोलवर रुजलेली असली तरी ती महिलांच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मान्यतांवर आक्षेप घेणारी खंबीर स्त्री आहे. ही अभूतपूर्व मालिका समाजाला त्रस्त करणाऱ्या हुंडा प्रथेवर प्रकाशझोत टाकते. त्यात नंदिनी एक शक्तीशाली मागणी करते की मला माझा हुंडा परत हवा आहे. कुछ रीत जगत की ऐसी है मालिकेत नंदिनीची भूमिका अभिनेत्री मीरा देवस्थळे साकारणार आहे. तिची व्यक्तिरेखा महिलांच्या आत्मसन्मानाला अपमानित करणाऱ्या कित्येक शतके जुन्या मान्यतांना आव्हान देणाऱ्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
गुजरातमध्ये घडणाऱ्या या मालिकेत नंदिनी ही मामा-मामी आणि तिचा भाऊ मीतसोबत राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्याकडे स्वत:ची नैतिक मूल्ये आहेत आणि ती आपल्या वडिलधाऱ्यांचा सन्मानही करते. मात्र जेव्हा केव्हा ती चुकीच्या गोष्टी घडताना पाहते तेव्हा त्यावर भूमिका घेण्यावर तिचा विश्वास आहे. आपल्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना मीरा देवस्थळे म्हणाली की, “मला वाटते की आवर्जून सांगितली जावी, अशी ही कथा आहे. आपल्या समाजात आजही अस्तित्वात असलेल्या कुरीतींबाबत बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. असे मजबूत उद्दिष्ट्य असलेली भूमिका साकारण्याबाबत मी खूप उत्सुक झालेले आहे.
ती पुढे म्हणाली की, मला वाटते की लेकी या प्रेम करण्यासाठी असतात, हुंड्याच्या नावाखाली वस्तुकरण करण्यासाठी नव्हे. मालिकेतील माझ्या भूमिकेच्या माध्यमातून मला ही छाप पाडायची खूप इच्छा आहे. आपल्या लग्नाच्या वेळी हुंडा देण्यात आल्याचे नंदिनीला माहितच नव्हते. मात्र ही मालिका तिच्या साहसी प्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुखी असतानाही ती आपल्या सासू-सासऱ्यांविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेते अन् म्हणते,मला माझा हुंडा परत हवा आहे