Join us

अभिनेत्री मृणाल दुसानिसने चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच घरी येणार छोटा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:11 IST

अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis)ने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहचली. त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेत काम केले. 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून तिने सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा 'हे मन बावरे' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर ती बराच मोठा कालावधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून गायब झाली होती. दरम्यान आता तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार असल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.

मृणाल दुसानिस हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे कपडे, शूज आणि एक टेडी बिअर ठेवलेला दिसतो आहे. त्यातील कपड्यावर कमिंग सून असे लिहिलेले पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करून मृणाल दुसानिसने लिहिले की, आम्ही ठरवले आहे की आम्हाला यापुढे झोपायचे नाही, स्वतःसाठी वेळ हवा आहे किंवा स्वच्छ घरात राहायचे आहे. आमचा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे.

मृणालच्या नवऱ्याचे नाव नीरज मोरे असून २५ फेब्रुवारी २०१६ ला दोघांनी लग्न केले. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरजसोबत अरेंज मॅरेज केले. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते.

टॅग्स :मृणाल दुसानीस