Join us  

शिवाने एका दणक्यात उचलला सिलेंडर, शूटिंग करताना तारेवरची कसरत, पाहा BTS व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:24 PM

नुकतंच पूर्वाने या मालिकेच्या सेटवरील शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सिलेंडर उचलताना दिसत आहे.

काहीच महिन्यांपूर्वी झी मराठीवर 'शिवा' ही मालिका सुरू झाली. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील आशू आणि शिवा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'शिवा' मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत आहेत. पूर्वा या मालिकेत शिवा तर शाल्व आशूच्या भूमिकेत आहे. 

'शिवा' मालिकेमुळे पूर्वाच्या चाहत्या वर्गातही भर पडली आहे. पूर्वा सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्ट, वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सबरोबरच मालिकेच्या सेटवरील व्हिडिओदेखील शिवा शेअर करताना दिसते. नुकतंच पूर्वाने या मालिकेच्या सेटवरील शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सिलेंडर उचलताना दिसत आहे. 

या मालिकेत शिवा आणि आशूचं नुकतंच लग्न झालं आहे. त्यामुळे सुरुवातीला पँट शर्टमध्ये टॉम बॉय दिसणारी शिवा आता नव्या नवरीप्रमाणे साडी नेसून नटल्याचं पाहायला मिळतं. पूर्वाने शेअर केलेल्या व्हिडिओत मालिकेतील एका सीनमध्ये ती साडीत सिलेंडर उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला शिवा एका दणक्यात सिलेंडर उचलते. पण, नंतर मात्र सीन शूट करताना तिला तारेवरची कसरत करायला लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्वाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. "किती कष्ट आहेत, पूर्वा खरंच ग्रेट", "गुड जॉब", "कमाल", "बापरे... पडद्या मागे एवढी मेहनत करावी लागते... आणि director किती caring आणि co operative आहेत salute", "खरंच खूप मेहनत घेतली आहेस तू पूर्वा या सीनसाठी", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

सध्या 'शिवा' ही मालिका रंजक वळणावर आहे. याआधी पूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'भाग्य दिले तू मला', 'अजूनही बरसात आहे', 'छोटी खोटी लव्ह स्टोरी' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये ती दिसली होती. आता 'शिवा' मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी