स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री लोकांना खूप भावली. या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. यात दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, आता तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती लवकरच नव्या मालिकेत झळकणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार आहे. यात ती जानकीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने शेअर केलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, ती घरात धूप दाखवताना दिसते आहे. प्रत्येकीला वाटतं आपल्या घरात राम राज्य असावे. श्रीरामासारखा पती असावा. श्रीराम जानकी यांची आदर्श जोडी असून सुद्धा त्यांना आपल्याच माणसांमुळे वनवास भोगावा लागला. काळ बदलला तरी परिस्थिती बदलेलच असं नाही. म्हणतात ना व्यक्ती, तितक्या प्रकृती. तिची पूजा होते. तेवढ्यात आवाज येतो जानकी ऋषीचा फोन आला आहे. ती येते बोलून जाते.
रेश्माने प्रोमो शेअर करत लिहिले की, खेळामध्ये संसाराच्या, आनंदाचे राज्य येवू दे… नवी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’. लवकरच स्टार प्रवाहवर. या मालिकेत रेश्मा खूप छान दिसते आहे. हा प्रोमो पाहून सेलिब्रेटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. हा प्रोमो पाहून चाहते तिची नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.