अभिनेत्री रुची सवर्ण (Ruchi Savarn) हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) आणि रुची सवर्णला पुत्ररत्न झाले आहे. अंकितने आपल्या इन्स्टाग्रामवर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, - 'वेलकम होम.... बॉय'। दुसऱ्या पोस्टमध्ये तो लिहितात- 'ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले त्या सर्वांचे खूप खूप आभार. आता आमच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याला तुमचे सर्वांचे प्रेम मिळते आहे. सध्या रुची सवर्ण आणि अंकितवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. याआधी रुचीने तिचं मॅटर्निटी फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं.
एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम भाग्य यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या.मन फकिरा या सिनेमातही तो झळकला होता. लवकरच अंकित ‘पावनखिंड’ सिनेमात झळकणार आहे.