Join us

"स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर", अभिनेत्री ऋतुजा बागवेचं घर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:10 IST

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rutuja Bagwe Home Tour : घर म्हणजे केवळ चार भिंती, एक दार नाही, तर घर म्हणजे माणसं, घर म्हणजे आपली नाती. घर म्हणजे प्रेमाचा निवारा, संकटकाळी पाठीशी उभी असणारी हक्काची जागा... दमूनभागून घरी आल्यावर डोकं टेकायला मिळणारा निवारा.  समान्य माणसाची जशी घराची व्याख्या असते तीच सेलिब्रिटींचीही असते. गेल्या वर्षात अनेक कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या बळावर घराचं स्वप्न पूर्ण केलं. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. आता नुकतंच तिच्या घराला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने ऋतुजाने तिच्या घराची सफर चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करुन दिली आहे.

ऋतुजाने घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहलं, "स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर". व्हिडीओमध्ये ऋतुजाने सजवलेल्या घराची सुंदर झलक पाहयाला मिळतेय. तिनं घराच्या नेमप्लेटवर "ऋतुजा प्रतिभा राजन बागवे" असं  पुर्ण नाव लिहिलेलं आहे. तिच्या घरात सुंदर अशा पेंटिंग दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या घराच्या खिडकीतून सुंदर असा निसर्ग दिसतोय. तिच संपुर्ण घराचं इंटीरिअर हे पांढऱ्या रंगांच आहे. त्याशिवाय आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं तिचं मॉर्डन किचन आहे. 

 ऋतुजाने घेतलेलं हे घर तिने स्वकमाईतून घेतलेलं आहे. त्यामुळे हे घर तिच्यासाठी तिच्यासाठी खास आहे.  ऋतुजाने आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. आतापर्यंत तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.  छोट्या पडद्यासोबत ऋतुजा रंगभूमीवरही रमते. तिची प्रमुख भूमिका असलेले 'अनन्या' हे नाटक खूप गाजले. या मालिकेत तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. याशिवाय काही वेब सिरीजमध्येही ऋतुजा झळकली आहे. सध्या ऋतुजा ही 'माटी से बंधी डोर' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :ऋतुजा बागवेठाणेमुंबईसुंदर गृहनियोजन