Join us  

Sai Lokur : लेकीला ६ महिने होताच अभिनेत्री सई झाली व्यक्त, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:19 PM

सईच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Sai Lokur : 'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री सई लोकूरने तिच्या लेकीला ६ महिने पूर्ण होताच तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. सईच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सईने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, 'माझ्या बाळाला सहा महिने पुर्ण झाले आहेत. ताशी तुझी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि तुला वाढवण्याची संधी देण्यासाठी धन्यवाद. तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली परी आहेस. तुझी आई म्हणून माझी निवड करण्यासाठी तुझे आभार. तु माझं सर्वस्व आहेस, देव तुझं भल करो'. 

सईच्या लेकीचं नाव 'ताशी' असं ठेवलं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता. चिमुकली आयुष्यात आल्याने सई आणि तिचा पती तीर्थदीप आनंदी आहेत.सईनं २०२० मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर ३ वर्षांनी सई आणि तीर्थदीप आईबाबा झाले आहेत. 

 सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही सई सहभागी झाली होती.  सईने 'पारंबी', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', 'कीस किसको प्यार करु', 'जरब', 'मी आणि यू' या चित्रपटात काम केलं आहे. सध्या अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असून मातृत्वाचा आनंद घेत आहे.  सई लोकूर सोशल मीडियावर सक्रीय असते. सई तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. 

टॅग्स :सई लोकूरसेलिब्रिटीमराठी अभिनेताबिग बॉस मराठीसोशल मीडिया