Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीने पंजाबी इंडस्ट्रीची केली पोलखोल, म्हणाली, "हे वर्षानुवर्षे होत आलं आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 5:39 PM

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीपेक्षा जास्त सम्मान मला मुंबईत मिळतो.

बिग बॉस १४ मध्ये सहभागी झालेली पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री सारा गुरपाल (Sara Gurpal) सध्या चर्चेत आहे. तिने नुकतंच पंजाबी फिल्म इंडस्ट्रीला एक्स्पोज केलं आहे. अनेकदा तिला सांगितलेली भूमिका एक आणि मिळालेली भूमिका वेगळीच अशा प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. तसंच तिने पंजाबी इंडस्ट्रीपेक्षा मुंबईत जास्त आदर मिळतो असाही खुलासा केला. नक्की काय म्हणाली सारा गुरपाल?

टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सारा गुरपाल म्हणाली, "मी पंजाबी फिल्म इंडस्ट्रीवर खूप नाराज आहे. काही दिवसांपासून मला खूप निराश वाटत आहे. मला एक पंजाबी फिल्म ऑफर झाली होती. मी होकारही दिला होता. पण शूटिंग करताना मला कळलं की मला जी भूमिका ऑफर झाली होती ती यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. हे या इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे चालत आलं आहे."

ती पुढे म्हणाली, "मी १० वर्षांपासून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तरी इथे मला एवढा सम्मान मिळाला नाही जितका सामान्यत: मुंबईत मिळतो. ते लोक तुमची फॉलोअर्स बघून निवड करतात. त्यांनी  बिग बॉस नंतर माझ्या प्रसिद्धीचा खूप वापर केला. पण काही हरकत नाही. "

सारा गुरपालच्या या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर पंजाबी इंडस्ट्रीवर खूप टीका होत आहे. साराने अनेक पंजाबी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने २०१७ मध्ये 'मंजे बिस्त्रे' मधून पदार्पण केले होते. 

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडिया