Join us

रूप पाहून वयही कळेना! श्वेता तिवारीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:59 IST

४४व्या वर्षीही दिसते मदनाची मंजिरी! श्वेता तिवारीच्या परफेक्ट सलीम फिगरचं रहस्य काय? जाणून घ्या...

Shweta Tiwari Fitness Secret : ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी आजही आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करते. या मालिकेनंतर श्वेता अनेक प्रोजेक्ट्समध्ये झळकली.  गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय असणारी श्वेता तिवारी आता ४४ वर्षांची झाली आहे. मात्र, तिचं सौंदर्य पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे कठीणच होते. चाळीशी पार केलेली श्वेता या वयातही आपल्या टोन्ड फिगरने सगळ्यांना घायाळ करते. तिच्या या फिटनेस आणि सौंदर्याचं रहस्य काय आहे? चला जाणून घेऊया...

फिट राहण्यासाठी काय करते श्वेता?सुपरफिट दिसणारी श्वेता तिवारी रोज न चुकता व्यायाम करते. यामुळे तिला निरोगी राहण्यास मदत होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे, असे अभिनेत्रीचे मत आहे. तिच्या रोजच्या व्यायामात वजन आणि ताकद वाढवण्यासाठी वेट-स्ट्रेंथ ट्रेनिंग सामील असते. यामुळे तिचे वजन संतुलित राहते आणि मेटाबॉल्जिम अर्थात चयापचय देखील वाढतो.

शरीर दिवसभर हायड्रेटेड राहावे म्हणून श्वेता भरपूर पाणी पिते. तिच्या फिटनेस प्रवासात पाणी पिण्याला खूप महत्त्व आहे. शरीर हायड्रेट राहिल्याने विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा देखील चमकदार होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ती पाण्यासोबतच लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ग्रीन टीचे सेवन देखील करते. 

चमकदार त्वचेच रहस्य काय?मीडिया रिपोर्टनुसार, श्वेता तिवारी तिच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हळद आणि दुधाची पेस्ट लावते. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसण्यास मदत होते. यासोबतच ती मुलतानी माती फेसपॅक देखील वापरते.

काय आहे अभिनेत्रीचा डाएट प्लॅन?श्वेता तिवारीच्या फिटनेसमध्ये आहाराला देखील खूप महत्त्व आहे. ती सकाळच्या नाश्त्यात ब्राऊन ब्रेड, अंडी आणि एक कप चहा घेते. यामुळे दिवसभर तिच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. तिच्या दुपारच्या जेवणात पराठा, पनीर भुर्जी, सॅलड आणि कमी चरबीयुक्त दही यांचा समावेश असतो. आहारातील सर्व आवश्यक पोषक तत्वांचे संतुलन राखण्यासाठी ती सॅलड आवर्जून खाते. श्वेताचे रात्रीचे जेवण प्रथिनेयुक्त असते, ज्यामध्ये तिला सॅलडसोबत चिकन आणि मासे खायला आवडतात.

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याचं रहस्य सांगताना म्हणते की, सुंदर दिसण्यासाठी आनंदी राहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. शरीराला आवश्यक असणारी ८ तासाची पुरेशी झोप घेतली की, सगळा थकवा दूर होतो आणि एक नवी ऊर्जा संचारते. यामुळे तणाव देखील दूर होतो. श्वेताच्या या टिप्स वापरून तुम्ही देखील चाळीशीत २५ वर्षांचे दिसू शकता.

टॅग्स :श्वेता तिवारीफिटनेस टिप्स