टीव्हीवरचा सर्वात चर्चेतला आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 17 (Bigg Boss 17) वा सिझन लवकरच सुरु होत आहे. यंदाच्या सिझनचंही सूत्रसंचालन दबंग अभिनेता सलमान खानच (Salman Khan) करणार आहे. काही दिवसांपूर्वीच नवीन सिझनचा प्रोमो रिलीज झाला. अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे कपल या सिझनमध्ये सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. तर आता टीव्हीवरील आणखी एका सूनेचं नाव समोर आलं आहे.
15 ऑक्टोबरपासून 'बिग बॉस 17' भेटीला येत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार रविवार रात्री ९ वाजता शो टेलिकास्ट होणार आहे. हा सिझन सिंगल विरुद्ध कपल असा असणार आहे. लेटेस्ट अपडेटनुसार, 'इश्कबाज' फेम अभिनेत्री सुरभी चंदनाचं नावही फायनल झालं आहे. मालिकेत नकुल मेहता आणि सुरभीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. याशिवाय सुरभीने प्रसिद्ध 'नागिन' मालिकेतही भूमिका केलीच
आदिल खानही असणार बिग बॉसचा भाग?
राखी सावंतमुळे प्रसिद्धीझोतात आलेला तिचा पती आदिल दुर्रानी खानलाही बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. मात्र त्याने शोला नकार दिला असल्याची चर्चा आहे. मी हे करु शकणार नाही असं त्याने सांगितलं.