Join us

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील कलाकारांसोबत तेजश्रीचं रियुनियन, मालिकेतील 'मुक्ता'च्या बाबांची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:00 IST

"काही वेळेस व्यावसायिक नात्यांमधून...", अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

लोकप्रिय मराठी मालिका 'प्रेमाची गोष्ट' मधून अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan)  काही महिन्यांपूर्वीच एक्झिट घेतली. तेजश्री मालिकेत मुक्ता ही मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या अचानक मालिकेतून जाण्याने चाहत्यांची खूप निराशा झाली. तेजश्रीने मालिका सोडण्याचं कारण अजूनही समजलेलं नाही. नुकतंच मालिकेतील काही कलाकारांची आणि तेजश्रीची भेट झाली. मालिका सोडल्यानंतरही तेजश्रीचं काही कलाकारांसोबत चांगलं नातं आहे. त्याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. मालिकेत तिच्या वडिलांची भूमिका साकारणारे योगेश केळकर यांनी या भेटीचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

अभिनेते योगेश केळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तसंच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे, अभिनेता आयुष भिडे, कोमल बालाजी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानही दिसत आहे. या सर्वांच्या गेट टुगेदरचा हा फोटो आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर भेटीचा आनंद आहे. योगेश केळकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले," काही वेळेस 'व्यावसायिक' नात्यांमधून असे बंध जुळले जातात की अगदी आयुष्यभर जपून ठेवले जातात. मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेले 'आम्ही' पण आता असेच सोबत असू. कामं होत राहतील, आयुष्यात चढ - उतार देखील होत राहतील, पण ही 'सोबत' अशीच कायम राहो हीच त्या 'नटेश्वरा' चरणी प्रार्थना. राजस, उमेश दादा, अमृता..... पुढच्यावेळी तुम्ही पण असायलाच हवे सोबत..... या वेळी माफ केलं तुम्हाला."

या पोस्टवर तेजश्रीने कमेंट करत 'कायम' असे लिहिले आहे. मालिकेतील कलाकारांसोबत तेजश्रीला पाहून चाहत्यांनाही आनंदच झाला आहे. अभिनेत्री स्वदरदा ठिगळेने मालिकेत तेजश्रीला रिप्लेस केलं आहे. स्वरदाचाही अभिनय आता लोकांना आवडायला लागला आहे. सध्या मालिका टीआरपीत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये असते.

टॅग्स :तेजश्री प्रधान मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडिया