बिग बॉस मराठीमधून आज वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला आहे. वर्षा उसगांवकर या आठवड्यात नॉमिनेट होत्या. अखेर बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला अवघे तीन दिवस बाकी असताना वर्षा उसगांवकर यांना बिग बॉस मराठीच्या घराला रामराम ठोकावा लागला आहे. वर्षा यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मजल मारली होती. अखेर वर्षा यांचा बिग बॉस यांना आज मिड वीक एविक्शनमध्ये घराबाहेर जावं लागलं आहे.
वर्षा उसगांवकर घराबाहेर
महाराष्ट्राची वंडर गर्ल अशी ओळख असणाऱ्या वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्या आहेत. या आठवड्यात निक्की तांबोळीने तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारल्याने फायनलमध्ये निक्कीने तिचं स्थान पक्क केलंय. त्यामुळे या आठवड्यात निक्की सोडून वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सहा जण नॉमिनेट होते. त्यापैकी वर्षा उसगांवकर यांना आज मिड वीक एविक्शनमध्ये घराबाहेर जावं लागलंय.
वर्षा उसगांवकरांचा बिग बॉसमधील प्रवास
वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या स्पर्धक होत्या. वर्षा यांनी प्रत्येक टास्कमध्ये वयाचा विचार न करता उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. वर्षा यांना सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीकडून मोठी टीका सहन करावी लागली. वर्षा यांच्या वयाचा मान न ठेवल्याने रितेशभाऊंनी जान्हवी आणि निक्कीला चांगलंच सुनावलं. वर्षा यांचे मागील काही दिवसांमध्ये B टीममध्ये मतभेद सुरु होते. अखेर आज मिड वीक एविक्शनमध्ये वर्षा उसगांवकरांना घराबाहेर जावं लागल्याने त्यांच्या फॅन्सना धक्का बसला असेल यात शंका नाही.