अभिनेत्री अदिती मलिक ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक उत्तम शोमध्ये काम केलं आहे. अदितीची तब्येत सध्या ठीक नाही. सोशल मीडियावर तिने आजारी असल्याची माहिती दिली. अभिनेत्रीने नेब्युलायझरसोबत एक पोस्ट शेअर केली. अदिती मलिकने सोशल मीडियावर हेल्थ अपडेट दिले आहेत.
"काय आठवडा होता तो... सतत खोकला. माझं नाक जणू काही ट्रॅफिक जाम असल्यासारखं बंद झालं आहे. ताप आणि अंगदुखी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझा आवाज गमावला. आज मला बरं वाटत आहे. मला आशा आहे की, उद्यापर्यंत मीही बोलू शकेन. घरगुती उपचार आणि औषधांसह हे एक मिशन वाटतं आहे. शेवटी नेब्युलायझर आणि झोपेमुळे खूप मदत झाली" असं अदितीने म्हटलं आहे.
अभिनेत्रीचं लग्न अभिनेता मोहित मलिकशी झालं आहे. एका मालिकेत काम करत असताना दोघेही प्रेमात पडले. १ डिसेंबर २०१० रोजी त्यांचं लग्न झालं. २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला. अभिनेत्री आता टीव्ही जगतापासून दूर आहे.
अदिती तिच्या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. सोशल मीडियाद्वारे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत राहते. ती एक बिझनेसवुमन आहे. अदिती मुंबईत एक रेस्टॉरंट चालवते. अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध शोमध्ये काम केलं आहे.