आदिती राठोड सांगतेय, मला चित्रपटात करायचे नाहीये काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 5:14 AM
‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या लोकप्रिय मालिकेत अवनी आणि नीलंजना या दोन्ही व्यक्तिरेखा अभिनेत्री आदिती राठोड साकारत आहे. तिच्या या ...
‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या लोकप्रिय मालिकेत अवनी आणि नीलंजना या दोन्ही व्यक्तिरेखा अभिनेत्री आदिती राठोड साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवल्यानंतर प्रत्येक कलाकाराला मोठा पडदा खुणावत असतो. पण आपल्याला इतक्यातच हिंदी चित्रपटांमध्ये स्वारस्य नसल्याचे आदितीने स्पष्ट केले आहे. आदिती सांगते, मला पहिल्यापासूनच टीव्हीच्या छोट्या पडद्यावर काहीतरी भव्यदिव्य भूमिका साकारण्याची इच्छा होती. मला सध्या टीव्हीच अधिक आवडतो. प्रेक्षकांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहतील, अशा काही उत्कृष्ट भूमिका मला टीव्हीवर साकारायच्या आहेत. चित्रपटांत भूमिका करणे हे माझे ध्येय नाही. मला टीव्हीच्या छोट्या पडद्यावरच भव्य, प्रभावी भूमिका रंगवायची इच्छा आहे.‘नामकरण’ ही आदिती राठोडची पहिलीच मालिका असून त्यात ती नायिकेची भूमिका रंगवत आहे. त्याबद्दल आदिती सांगते, “तुम्ही मालिकेची नायिका असाल आणि मालिकेचे कथानक तुमच्याभोवतीच फिरत असेल, तर तुमची जबाबदारी वाढते. अशा भूमिकेसाठी तुम्हाला अधिक वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी कटिबद्धता असावी लागते. मी माझी भूमिका माझ्या परीने शक्य तितकी वास्तववादी रंगवीत आहे. आम्ही महिन्याचे जवळपास सर्वच दिवस काम करत असतो. रोजची शिफ्टही निदान बारा तासांची, कधी कधी त्यापेक्षाही अधिक वेळ चालते. पण ही गोष्ट आम्ही स्वत:च निवडली आहे, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करता येणार नाही.”मालिकेचे कथानक आता दहा वर्षांनी पुढे जाणार आहे. त्यानंतर नील आणि अवनी हे विभक्त होणार असून अवनी आपला भूतकाळ विसरून नीलंजना नावाने आपले जीवन नव्याने सुरू करणार आहे. ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटातील दीपिका पादुकोणच्या नयना या अभ्यासू, गंभीर व्यक्तिरेखेवर तिची नीलंजनाची भूमिका आधारित आहे. “माझा नवा लूक हा खूप वेगळा आहे. मी यापुढे साड्या वापरणार नसून पाश्चिमात्य पोशाख घालणार असून चष्मा वापरणार आहे.” ‘नामकरण’ या मालिकेत अवनी आणि नील पुन्हा एकत्र येतील का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. Also Read : नामकरणमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आदिती राठोडचे नवे रूप