गायक आणि शो होस्ट आदित्य नारायण अलीकडेचं लग्नाच्या बेडीत अडकला आहे. १ डिसेंबरला आदित्यने त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कोरोनामुळे दित्यच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळचे नातेवाईक असे 50 पाहुणेचं उपस्थित होते.
लग्नानंतर आदित्य नारायण पत्नी श्वेतासमवेत नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. आदित्यने एक आलिशान अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे. आदित्य म्हणाला, 'मी अंधेरीमध्ये ५ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट माझ्या आई वडिलांच्या घरापासून फक्त ३ इमारती सोडून आहे. आम्ही पुढील ३-४ महिन्यांनंतर या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊ.'