Join us

‘इंडियन आयडल 12’ला ‘फेक’ म्हणणार्‍यांवर बिथरला आदित्य नारायण, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 12:21 PM

Indian Idol 12 : गेल्या काही महिन्यांपासून ‘इंडियन आयडल 12’ हा रिअ‍ॅलिटी शो सतत वादात आहे. आता पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणने टीकेला उत्तर दिले आहे.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’ हे आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी सीजन असल्याचा दावाही त्याने केला. गेल्या 10 वर्षांतील हा सीझन सर्वाधिक यशस्वी ठरला, मला याचा आनंद आहे, असे तो म्हणाला..

गेल्या काही महिन्यांपासून ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) हा रिअ‍ॅलिटी शो सतत वादात आहे. शोच्या स्पर्धकांपासून तर शोचे जजेस आणि होस्टही ट्रोल होत आहेत. शोमध्ये येणा-या खास पाहुण्यांना  स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले जाते, असा एक आरोपही होतोय. इतकेच नाही तर मेकर्सचा पक्षपातीपणा आणि चुकीच्या निर्णयावरही टीका होतेय. आता पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) या टीकेला उत्तर दिले आहे.स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आदित्य बोलला. शोच्या जजेसवर स्पर्धकांचे कौतुक करायचा कुठलाही दबाव नाहीये. शो संपण्यास फक्त 4 आठवडे उरले आहे. आम्ही हा सीझन प्रेम आणि पॉझिटीव्हीसोबत संपवू इच्छितो, असे आदित्य म्हणाला. इतकेच नाही तर ‘इंडियन आयडल 12’ हे आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी सीजन असल्याचा दावाही त्याने केला. गेल्या 10 वर्षांतील हा सीझन सर्वाधिक यशस्वी ठरला, मला याचा आनंद आहे, असे तो म्हणाला..

तुम्ही जसे आहात, तसेच राहा...इंडियन आयडलमध्ये येणा-या स्पेशल गेस्टला स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले जाते, या आरोपावरही तो बोलला. इथे कुठलाही दबाव नाही. जोपर्यंत मी हा शो होस्ट करतोय, तोपर्यंत तुम्हाला औपचारिकता करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात, तसे राहा. तशा कमेंट्स द्या. जे बोलू इच्छिता ते बोला. फक्त आमच्या शोमध्ये या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. मी अन्य सीझनबद्दल बोलू इच्छित नाही. पण चालू सीझनमध्ये कुणावरही कोणताही दबाव नाही, असे आदित्य म्हणाला.

तुम्हाला आठवत असेलच की, किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कंटेस्टंटने गायलेली किशोर कुमार यांची गाणी प्रेक्षकांना आवडली नव्हती. यावरून सोशल मीडियावर शोची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमित कुमार यांनी मला स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते, तेच मी केले, असे उत्तर दिले होते.   

टॅग्स :आदित्य नारायणइंडियन आयडॉल