Join us

‘इंडियन आयडल 12’चा होस्ट आदित्य नारायणची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 1:41 PM

आदित्य नारायण हा टीव्ही इंडस्ट्रीतील मोठा होस्ट आहे. आत्तापर्यंत 12 शो होस्ट करणारा आदित्य सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन होस्ट करतोय. आता त्यानं एक मोठी घोषणा केलीये.

ठळक मुद्देहोस्टिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. पण आता जगभर परफॉर्म करू इच्छितो. स्टेजवर थिरकू इच्छितो’, असं त्यानं सांगितलं.

आदित्य नारायण  (Aditya Narayan) हा टीव्ही इंडस्ट्रीतील मोठा होस्ट आहे. आत्तापर्यंत सुमारे 12 शो होस्ट करणारा आदित्य सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा  (Indian Idol 12) सीझन होस्ट करतोय. पण आता कदाचित होस्टिंगमध्ये आदित्यला फार राम दिसत नाही. होय, त्यामुळेच त्यानं एक मोठी घोषणा केलीये. 2022 नंतर मी होस्टिंग करणार नाही. होस्ट म्हणून हे माझं अखेरचं वर्ष असेल, असं त्यानं जाहिर केलंय.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्यनं त्याचा हा निर्णय जाहिर केला. ‘आता नव्या आणि मोठ्या जबाबदाºया खांद्यावर घेण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आलीये. टीव्ही होस्ट या नात्यानं 2022 हे माझं अखेरचं वर्ष असेल. यानंतर मी होस्टिंग करणार नाही. मी आधीच काही कमिटमेंट्स केल्या आहेत. येणाºया काही महिन्यांत मी त्या पूर्ण करेल. माझे टीव्ही इंडस्ट्रीसोबत प्रेमळ संबंध आहेत. अशात माझा निर्णय कदाचित अनेकांना निराश करणारा ठरेल. पण माझा निर्णय झालाये,’असं आदित्य म्हणाला.

होस्टिंग सोडल्यानंतर काय करणार? असं विचारलं असता, ‘मी पुढच्या वर्षी टीव्हीवरून थोडा ब्रेक घेईल. एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडत असल्या तरी हे काम थकवणारं आहे. गेल्या 15 वर्षांपासून मी टीव्ही इंडस्ट्रीचा भाग आहे, याचा मला आनंद आहे. सर्वांचा मी आभारी आहे. टीव्हीवर काम सुरू केलं तेव्हा मी खूप लहान होतो. पुढच्या वर्षी मी टीव्हीवरून ब्रेक घेईल तेव्हा बाप झालेलो असेल. टीव्ही इंडस्ट्रीने मला नाव, पैसा, ग्लॅमर सगळं काही दिलं. मुंबईत स्वत:चं घर, स्वत:ची कार, अलिशान आयुष्य मिळालं. पण आता होस्टिंग नाही. मी टीव्ही इंडस्ट्री कायमची सोडतोय, असं अजिबात नाही. मात्र वेगळं काही करेल. कदाचित गेम शोमध्ये भाग घेईल, शो जज करेल. होस्टिंग मात्र करणार नाही. होस्टिंग सोडत असल्याचा निर्णय मी लवकरच ‘इंडियन आयडल 12’च्या मंचावर जाहिर करणार आहे. जेणेकरून मला लोक पुढच्या शोसाठी विचारणार नाहीत.  होस्टिंग माझं हे पहिलं प्रेम आहे. पण आता जगभर परफॉर्म करू इच्छितो. स्टेजवर थिरकू इच्छितो’, असं त्यानं सांगितलं.

टॅग्स :आदित्य नारायण