KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या खुमासदार शैलीत KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. यंदा KBC 16 मध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक प्रेक्षकांचं मन जिंकतंय. अमिताभ सुद्धा त्यांच्या खास शैलीत स्पर्धकांना बोलतं करुन त्यांच्या आयुष्याची कहाणी जाणून घेत आहेत. KBC 16 मध्ये आदिवासी भागातून आलेला एका स्पर्धकाने ५० लाख जिंकले. परंतु १ कोटींच्या प्रश्नावर या स्पर्धकाने खेळ सोडला. काय होता १ कोटीचा प्रश्न
१ कोटीच्या या प्रश्नावर सोडला खेळ
KBC 16 मध्ये आदिवासी भागातून आलेला बंटी वाडिया सहभागी झाला होता. बंटीने बिनधास्त खेळून त्याच्या हुशारीने ५० लाख जिंकून १ कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. पण बंटीला १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. १ कोटीचा प्रश्न पुढीलप्रमाणे
1948 में बंगाली मूर्तिकार चिंतामणि कर ने ‘द स्टैग’ नामक कलाकृति के लिए इनमें से कौन सा पुरस्कार जीता था?
A- पाइथागोरस प्राइज
B- नोबेल प्राइज
C- ऑलिम्पिक मेडल
D- ऑस्कर मेडल
हे होतं या प्रश्नाचं उत्तर
आदिवासी स्पर्धक बंटी वाडियाला या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. उत्तर चुकलं असतं तर जिंकलेले ५० लाखही त्याने गमावले असते. त्यामुळे रिस्क न घेता बंटीने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑलिम्पिक मेडल. १९४८ मध्ये लंडनमध्ये जी ऑलिम्पिक कला स्पर्धा पार पडली होती त्यामध्ये चिंतामणि कर यांना सिल्व्हर मेडलने सन्मानित करण्यात आलं होतं, अशी माहिती बिग बींनी सांगितली.