कॉमेडीक्वीन भारती सिंग ( Bharti Singh) नुकतीच आई झाली. नुकताच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नवव्या महिन्यापर्यंत भारती काम करत होती आणि आता 12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून ती ‘हुनरबाज’ (Hunarbaaz: Desh Ki Shaan) या शोच्या शूटिंगवर परतली आहे. खरं तर भारती नवव्या महिन्यापर्यंत काम करतेय, हे पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं. पण तूर्तास 12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून कामावर परतल्यामुळे ती ट्रोल होतेय. ‘बघा, 12 दिवसाच्या बाळाला घरी सोडून आलीये. इतकी काय पैशांची हाव आहे,’ अशा कमेंट्स तिला ऐकायला मिळत आहेत. आता भारतीने ट्रोलर्सच्या या टीकेला उत्तर दिलं आहे.
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत भारती यावर बोलली. नोकरदार आईला कायम जज केल्या जातं. तुला सुद्धा असा काही अनुभव आला का? असा प्रश्न भारतीला या मुलाखतीत केला गेला. यावर ती म्हणाली, ‘हो, वर्किंग मॉम्सला लोक कायम जज करतात, तिला फुकटचे सल्ले देतात. मी सुद्धा यातून जातेय. 12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून आलीस,इतकी काय पैशांची गरज होती? अशा कमेंट्स मला ऐकायला मिळत आहेत. पण असे प्रश्न विचारून ट्रोल करणाºयांना मी सांगू इच्छिते की, मी पैशांसाठी नाही तर कमिटमेंट्समुळे कामावर आले. माझ्या क्षेत्रात एका व्यक्तिच्या जोरावर भागत नाही. त्याच्यासोबत अनेक लोक जुळलेले असतात. माझ्या क्षेत्रात वेळांना प्रचंड महत्त्व आहे. एका शोवर अनेकांची कुटुंब अवलंबून आहेत. अनेकजण माझ्या पाठीमागे बोलतात. पण अनेकजण मला सपोर्टही करतात. मी फक्त पॉझिटीव्ह कमेंट्स तेवढ्या घेते. निगेटीव्ह कमेंट्स ऐकल्या असल्या तर कदाचित दिवस भरेपर्यंत मी काम करूच शकले नसते. प्रेग्नंसीत काम करणारी मी एकटी महिला नाही. पोटात बाळ घेऊन सिग्नलवर सामान विकणाºया अनेक बायका मी रोज बघते. मी काही राजकुमारी नाहीये. मला कामाची गरज आहे. लोक बोलायला बोलतात. पण ज्याच्यावर प्रसंग गुदरतो, तोच जाणतो. त्यामुळे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’
मी जरी बाळाला सोडून आले असले तरी घरी लावलेल्या कॅमेऱ्यामुळे तो जरा जरी हलला तरी मला नोटीफिकेशन येतं. त्याच्यासाठी मी माझे दूध प्रिझर्व्ह करून येते आणि दिवसभर तो माझेच दूध पितो. त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या दोन्ही आज्जी आहेत, असंही भारतीने सांगितलं.