Join us

३ वर्षानंतर जितेन ललवानीचे पौराणिक मालिकेमध्‍ये पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 3:50 PM

जितेन ललवानी जवळपास ३ वर्षांच्‍या कालांरानंतर ही भूमिका दुस-यांदा साकारणे एक मोठं आव्हान मी स्विकारले आहे.

लोकप्रिय अभिनेता जितेन ललवानीचा दोन दशकांहून अधिक काळ टेलिव्हिजनवर विविध शैलीतील भूमिका साकारल्या आहेत. शनीदेव या आपल्‍या आधीच्‍या दमदार भूमिकेसह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केलेला अभिनेता पौराणिक मालिकेमध्‍ये परतण्‍यासाठी सज्‍ज आहे. जितेन छोट्या पडद्यावरील पौराणिक काल्‍पनिक मालिका 'परमावतार श्री कृष्‍णा'मध्‍ये शनीदेवाची महत्‍त्‍वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. भूमिकेच्‍या विविध न ऐकलेल्‍या कथांना सादर करण्‍यासह त्‍याच्‍या व्‍यक्तिमत्‍त्‍वाच्‍या विविध छटा दाखवत अभिनेता पुन्‍हा एकदा ही भूमिका साकारण्‍यासाठी सज्ज आहे. 

याबाबत जितेनने सांगितले की, ''मला नेहमीच पौराणिक मालिकेत भूमिका साकारायला आवडतात. शनीदेव भूमिकेबाबत माझ्या मनात अधिक उत्सुकता आहे. मी ही भूमिका यापूर्वी देखील साकारली असताना पुन्‍हा एकदा ती भूमिका साकारण्‍यास मी खूपच उत्‍सुक आहे. कारण या भूमिकेमध्‍ये वेगळी छटा आहे. कितीही कथा सांगितलेल्‍या असो पण शनीदेवाचे निश्चित पैलू व स्‍वभावाबाबत अजूनही स्‍पष्‍टपणे समजलेले नाही. 

'परमावतार श्री कृष्‍णा' मालिकेच्‍या माध्‍यमातून मला पडद्यावर ती भूमिका साकरण्‍याची संधी मिळाली आहे.याचा आनंद जास्त आहे. जवळपास ३ वर्षांच्‍या कालांरानंतर ही भूमिका दुस-यांदा साकारणे एक मोठं आव्हान मी स्विकारले आहे. जितेन याविषयी म्हणाला, ''मला विविध भूमिका साकारायला आवडतात. पण प्रत्‍येक भूमिका आधीच्‍या भूमिकेपेक्षा वेगळी असली पाहिजे. मला रोमांच व आव्‍हान आवडते. मला सकारात्‍मक भूमिकांसाठीच विचारण्‍यात आले आहे आणि त्‍या भूमिकांमध्‍ये निरागसता सामावलेली असते. पण मी काही नकारात्‍मक भूमिका देखील साकारल्‍या आहेत. यामुळे माझ्या अभिनेता या व्‍यक्तिमत्‍त्‍वामध्‍ये विविध छटांची भर पडली आहे. असे असले तरी, मी विनोदी शैलीचा देखील मनमुराद आनंद घेतो आणि अगदी पौराणिक प्रमाणेच मी विनोदी भूमिका देखील मनापासून साकारतो.''