Join us

'आई कुठे काय करते'नंतर स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिकाही घेतेय निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:01 IST

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'नंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका रसिकांचा निरोप घेत आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी निवेदिता सराफ आणि मंगेश देसाई यांची आई बाबा रिटायर होत आहेत ही नवीन मालिका दाखल होत आहे. दरम्यान आता अशी माहिती मिळतेय की, स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका म्हणजे लग्नाची बेडी (Lagnachi Bedi).

आई कुठे काय करतेनंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी ही मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. ही मालिका ३१ जानेवारी, २०२२ला दाखल झाली होती. या मालिकेत सायली देवधर सिंधूची, तर मधुराणी ही भूमिका रेवती लेले साकारत आहे तर संकेत पाठक राघवच्या भूमिकेत आहे. दोन वर्षांहून जास्त काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर आता ही मालिका बंद होत आहे. 

लग्नाची बेडी मालिकेच्या जागी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. मृणाल तब्बल चार वर्षांनंतर ती या मालिकेतून कमबॅक करते आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका