बिझी शेड्युअलमध्ये कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. त्यामुळे काही कलाकार फिट राहण्यासाठी वर्कआऊट करत जिममध्ये घाम गाळतात. तर काही कलाकार विविध योगासनं करतात. फिटनेसबाबत सजग असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे आशका गोराडिया. आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी आशका फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.
योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या टॉपलेस होत योगा करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. त्यामुळेच आशकाने टॉपलेस होत योगा करताना दिसते आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तसेच आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
आशकाने टॉपलेस योगा करण्याचा सल्ला तिच्या मित्र-मैत्रिणींनाही दिला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री अबिगैल पांडेने केलेने टॉपलेस होत योगा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर फोटो शेअर केल्यानंतर तिने मनाची शांती मिळण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय असे तिने सा-यांनाचा तिने योगा करण्याचा सल्लाही दिला होता. तसेच टॉपलेस होत योगा करण्याचा सल्ला मैत्रीण आशका गोराडियानेच दिला असल्याचेही ती सांगायला विसरली नाही.