Join us  

अमृता पवारनंतर मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 12:40 PM

अभिनेत्री अमृता पवार नील पाटीलसोबत नुकतीच विवाह बंधनात अडकली. यानंतर आणखी एक अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री हृता दुर्गुळेने प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर नुकतंच  'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अमृता पवार ही देखील विवाह बंधनात अडकली. त्यानंतर आता आणखी एक मराठी अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नातील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

'गोठ' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपल नंद. रुपल नंदने गुपचूप लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.रुपलचा सहकलाकार अभिनेता यशोमन आपटेनं तिच्या लग्नातील फोटो करत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता हो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रुपलने ही तिच्या इन्स्टास्टोरीवर लग्नातील काही फोटो शेअर केलेत. रुपलच्या पतीचं नाव अनिश कानविंदे आहे. रुपल लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसतेय. 

एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये रुपलने भाग घेतला होता. तिथे सतीष राजवाडे हे परीक्षक होते. त्यांना रुपला अपिअरन्स आवडला आणि त्यांनी तिला मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर अँडस जरा हटके चित्रपटातही तिची भूमिका होती. पण रुपला घराघरात ओळख मिळाली ती गोठ या मालिकेतील राधाच्या भूमिकेनं. गोठ मालिकेत राधाच्या कामाचं कौतुक झालं आणि तिला अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामाची संधीही त्यानिमित्ताने मिळाली.  

टॅग्स :ऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार