Join us

 मस्त जोक मारा रे...! भारती सिंहने पाच वर्षांपूर्वी केले होते हे ट्वीट अन् आज पाच वर्षानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 1:15 PM

भारतीचे एक जुने ट्वीट व्हायरल झाले आणि यावरून अनेकांनी भारतीला ट्रोल करणे सुरु केले.

ठळक मुद्दे भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर हर्षलाही अटक करण्यात आली.

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने  कॉमेडियन भारती सिंहला अटक केली आणि सर्वांनाच धक्का बसला. पाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचिया यालासुद्धा एनसीबीने अटक केली. याचदरम्यान भारतीचे एक जुने ट्वीट व्हायरल झाले आणि यावरून अनेकांनी भारतीला ट्रोल करणे सुरु केले.तर भारतीने 2015 साली हे ट्वीट केले होते. ‘प्लीज ड्रग्ज घेणे बंद करा, हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे,’ असे ट्वीट होते. या ट्वीटमधून भारतीने आपल्या चाहत्यांना अमली पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता लोकांना ड्रग्ज न घेण्याचा सल्ला देणारी भारती स्वत:च ड्रग्ज प्रकरणात अडकली आहे. हे पाहून लोकांनी तिची जोरदार खिल्ली उडवली.

 काय म्हणाले नेटकरीभारतीचे हे जुने ट्वीट व्हायरल होताच नेटक-यांनी त्यावर मजेदार कमेंट केल्या आहेत. हे ट्वीट सिद्ध करते की, भारती खरोखर कॉमेडियन आहे. मस्त जोक मारा रे..., असे एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले. 5 वर्षांपूर्वी भारती सिंह ड्रग्जवर लोकांना सल्ले देत होती, अशी कमेंट एकाने केली तर अन्य एकाने ‘हे ट्वीटही माल फूंक के किया था क्या’ असा सवाल केला.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवने केली टीकाड्रग्जप्रकरणी गजाआड झालेल्या भारती सिंहवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने जोरदार टीका केली. काय गरज आहे ड्रग्ज घ्यायची? ड्रग्ज घेतल्याशिवाय कॉमेडी होत नाही का? मी भारतीच्या लग्नात होतो. डान्स सुरु होता. धम्माल सुरु होती. रात्ररात्रभर डान्स करण्याची ऊर्जा यांना कुठून मिळते, हे थकत नाहीत का, असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. मात्र कदाचित लग्नाचा आनंद यांना इतकी एनर्जी देत असावा, असे समजून मी स्वत:चे समाधान केले होते. पण आत्ता कुठे या प्रश्नाचे खरे उत्तर मिळाले. हे असे सगळे करून हे लोक रात्रभर धिंगाणा घालू शकतात, हे आत्ता मला कळले, अशा शब्दांत राजू श्रीवास्तव यांनी टीका केली.

भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मा झाला ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

 

टॅग्स :भारती सिंगनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो