सध्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis) चर्चेत आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर ती भारतात परतली आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खूश आहेत आणि ते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतेच तिने भारतात आल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या पदार्थावर ताव मारला याबद्दल सांगितले.
अभिनेत्री मृणाल दुसानीसने लोकमत फिल्मीच्या एका कार्यक्रमात बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. यावेळी तिने भारतात आल्यावर पहिल्यांदा कोणता पदार्थ खाल्ला याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, भारतात आल्यावर पहिल्यांदा मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवर मी वडापाव खाल्ला. कारण मला वडापाव खायचा होता. तिथे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे मी वडापाव आणि कोथिंबीर वडी खाल्ली. चहा प्यायले. चहा आणि वडापाव खाल्यानंतर मला भारतात आल्याची जाणीव झाली. मग घरी आल्यानंतर आईच्या हातचे पोहे खाल्ले.
परदेशातही मिळत होते भारतीय पदार्थती पुढे म्हणाली की, आम्ही परदेशात जिथे राहत होतो तिथे बरेच भारतीय लोक राहतात. त्यामुळे गरोदरपणातही मी पाणीपुरी, डोसा खाल्ला. मला हवे ते सगळे मी तिकडे एक्सप्लोअर करू शकले कारण तिथे भारतीय राहत होते. मात्र घरची बात काही औरच असते. इथे आल्यावर मी आईच्या हातचे उकडीचे मोदक खाल्ले आणि तिच्या हातचा फोडणीचा भात खाल्ला.
लवकरच करणार कमबॅकलोकमत फिल्मीच्या मुलाखतीत मृणालने ती कायमची भारतात परतल्याचे सांगितले. तसेच आता ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिनयात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्याचे म्हटले. यावेळी तिने मालिकेत काम करणार असल्याचे सांगितले. शिवाय नाटकात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ती तीन-चार महिन्यात काम करताना दिसू शकते, असेही सांगितले.