मराठी अभिनेत्री ईशा केसकरच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ईशाने याबद्दलची माहिती दिली. मात्र वडिलांच्या निधनाच्या काही दिवसानंतर तिने गोव्याच्या समुद्र किनारी वेळ व्यतित करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी तिला ट्रोलदेखील केले. अखेर आता तिने यावरील चुप्पी तोडली आहे. तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारताना याबाबतचा खुलासा केला आहे.
ईशाचे वडील चैतन्य केसकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अनेकदा ईशा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. बाप लेकीमध्ये घट्ट बॉन्डींगही पाहायला मिळाले. वडिलांच्या निधनाच्या दहा दिवसांच्या आत ती गोव्याला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांना तिने असे का केले असा प्रश्न पडला होता. अखेर तिने याबाबत खुलासा केला.