Join us

तब्बल पाच वर्षांनी राणी मुखर्जी आणि करण जोहर येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:09 AM

करण जोहर आणि  राणी मुखर्जीच्या  जोडीने आत्तापर्यंत बॉलिवूड अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यात १९९८ मधला कुछ कुछ होता ...

करण जोहर आणि  राणी मुखर्जीच्या  जोडीने आत्तापर्यंत बॉलिवूड अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यात १९९८ मधला कुछ कुछ होता है , २००६ मध्ये कभी अलविदा ना कहाना  आणि २०१३ मधे आलेला बॉम्बे टॉकीज अशा काही चित्रपटांनी करण आणि राणीच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर बऱ्याच काळ ही जोडी एकत्र दिसलीच नाही. तब्बल ५ वर्षानंतर राणी आणि करण जोहरची जोडी एकत्र आली आहे.  होय, तुम्ही बरोबर वाचलात  राणी आणि करण ५ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. करण जोहरच्या इंडियाज नेक्स सुपरस्टार या शोमध्ये राणी मुखर्जी हजेरी लावणार आहे.  राणी मुखर्जी तिच्या 'हिचकी' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने कारण जोहरच्या 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' येणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी आणि करण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते फुल्ल ऑन धमाल करतात तशीच अपेक्षा आहे की ते या शो मध्ये ही करतील.  राणीने  आपल्या हिचकीच्या प्रोमोशन बरोबर एक कॅम्पेन  सुरु केले आहे. त्याचे नाव "आपकी हिचकी क्या है?". हा कॅम्पेन अंतर्गत राणीने सलमान खानला बिग बॉच्या शोमध्ये प्रश्न विचारला होता. राणीने सलमानला लग्नच्या हिचकीबद्दल प्रश्न विचारला आणि त्याला लग्न करण्यापेक्षा वडील बनायचा पर्याय सुचवला होता. आता राणी करणला त्याच्या हिचकीबाबत प्रश्न विचारणार आहे आणि त्यावर करण काय उत्तर देतो हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ALSO READ :   या कारणामुळे गाडीत बसून रडली राणी मुखर्जीसूत्रांचे म्हणणे आहे की, करण जोहर नेहमी सेलिब्रिंटीची सोफ्यावर बसून कॉफी घेता घेता फिरकी घेत असतो पण ह्यावेळेस मात्र चित्र उलटे असेल, इंडियाज  नेक्स्ट सुपरस्टार च्या या भागात राणीच करणची फिरकी घेताना दिसणार आहे. राणीचा सेन्स ऑफ ह्यूमर आणि करणचा हजरजबाबीपणा ह्यांची जुगलबंदी बघायला धमाल येणार आहे ह्यावरून हा भाग खूपच  मनोरंजक ठरणार आहे असे दिसून येते.हिचकी चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला  टॉरेट सिंड्रोमने नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोन वेळा बोलते. तसेच बोलता बोलता विचित्र आवाज काढते, तिच्या या सवयीमुळे तिच्या आयुष्यात काशी आव्हान येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाऊन ती मात करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याच बरोबर समाजात कमजोर व्यक्ती आणि कणखर व्यक्ती ह्यात चालू असलेला भेदभाव यात दिसून येईल. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे पण तीच्या आजारपणा मुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघर्षाची गोष्ट सुरु होते.  महेश शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट २३फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.