Join us

शिक्षकाची नोकरी सोडून संचित चौधरी वळला अभिनयाकडे, 'तुझ्या इश्काचा नादखुळा'मध्ये साकारतोय रघूची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 5:00 PM

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केले आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. 

संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केले. नोकरी करता करता हे सर्व चालू होते.

अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हते. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली.

 स्टार प्रवाहवरील प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा  साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे. ‘रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो’ हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. स्वातीवर त्याचे जीवापाड प्रेम आहे. स्वाती रघूच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल. त्यासाठी न चुकता पाहा तुझ्या इश्काचा नादखुळा दररोज रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

टॅग्स :स्टार प्रवाहटेलिव्हिजन