Join us

परी, चिंगीनंतर आणखी एक बालकलाकार करतेय मालिका विश्वात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 6:00 AM

सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच.

सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच. या बालकलाकरांचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ'. या बालकलाकार परीने या मालिकेची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली. 

अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नवा गडी नवं राज्य मालिकेतील चिंगीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  चिंगी उर्फ सायशा भोईर या आधी आपल्याला रंग माझा वेगळा मालिकेत दिसली होती. ऐकूणच छोट्या पडद्यावर बाल कलाकारांची चलती आहे. आता आणखी एक बालकालाकार टीव्ही विश्वात पदार्पण करतेय. 

सोनी मराठीवर 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित होणारी  ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्यं, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे. 'शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस'  असं ब्रीदवाक्य  असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. 

                             या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हिनी साकारली आहे. मूळची कोकणातली असलेली रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष  ठरेल. तर मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. तर 'इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ' असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल.  

टॅग्स :वीणा जामकरसेलिब्रिटी