Join us  

'पिंकीचा विजय असो'नंतर शरयु सोनावणेची नव्या मालिकेत एन्ट्री, साकारणार नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 9:40 AM

मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शरयु सोनावणे (Sharayu Sonawane). तिने आतापर्यंत प्रेम पॉईजन पंगा, पिंकीचा विजय असो मालिकेत काम केले आहे.

मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शरयु सोनावणे (Sharayu Sonawane). तिने आतापर्यंत प्रेम पॉईजन पंगा, पिंकीचा विजय असो मालिकेत काम केले आहे. तिला पिंकीचा विजय असो या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता या मालिकेनंतर ती नव्या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीवर नव्याने दाखल होत असलेल्या पारू (Paru) मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक नवीन मालिका पारू. ही गोष्ट आहे, गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या पारूची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडच निरागसपणा घेऊन आलीये, ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आलीये. शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का?  हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.

ट्रम्प कार्ड प्रोडक्शन ने ह्या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत राजू सावंत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. तिच्या सोबत असतील प्रमुख भूमिकेत असतील प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकार असणार आहेत.