मराठी चित्रपटसृष्टीची परम सुंदरी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) असंख्य कारणांनी सतत चर्चेत असते. अगदी युट्युब पासून हिट चित्रपटांपर्यंत सगळीकडे आपला दबदबा असलेल्या सईचे लाखो चाहते आहेत. सई तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आपल्या अटींवर जगते. मराठी इंडस्ट्रीचं नव्हे तर बॉलिवूडमध्येही तितक्यात कॉन्फिडन्समध्ये वावरते. मात्र तिच्या या सगळ्यात तिला खंबीर साथ मिळाली ती तिच्या आईची. सई अनेकवेळा तिच्या आईसोबतचे फोटो अनकवेळा शेअर करत असते. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला सईने आईसोबत हजेरी लावली..
नुकताच सईला झी चित्रगौरव पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. याचं सारं श्रेय सईनं तिच्या आईला दिलं आहे. आई आणि पुरस्कारासोबतचा एका सुंदर व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या आधी सईची आई आणि नंतर सई एकमेकांना गालावर किस करताना दिसतायेत. अनेकदा असे म्हटले जाते की मुलगी ही तिच्या आईचे प्रतिबिंब असते. तिची तिच्या कामासाठी असलेली उत्कटता आणि समर्पण ते तिच्या आजूबाजूच्या लोकांप्रती तिची अटळ बांधिलकी प्रत्येक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते यात शंका नाही.'असं कॅप्शन तिनं या फोटोसोबत दिलं आहे.
सईची आई मृणालिनी ताम्हणकर या सुद्धा सिंगल मदर आहेत. सई कॉलेजल असतानाच तिच्या आई बाबांचा घटस्फोट झाला. त्यानंतर साईची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या आईने घेतली.
सईची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. सेलिब्रेटींनसह नेटकऱ्यांनी तिच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya jatra ) या लोकप्रिय शोची जी जज आहे.