Join us

‘सुन करण कुंद्रा तू मेरे...,’ अभिजीत बिचुकलेनं आता करण कुंद्राला डिवचलं, चक्क दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 4:17 PM

Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless : ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले सलमान खानवर बरसला होता. आता बिचुकले ‘बिग बॉस 15’चा स्पर्धक करण कुंद्रावर उलटला आहे.

Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless : ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो कधीच संपला. पण चर्चा संपायचं नाव नाही. ‘बिग बॉस 15’मधील स्पर्धक या ना त्या निमित्ताने सतत चर्चेत असतात. आता चर्चा होतेय ती अभिजीत बिचुकलेची (Abhijit Bichukale). होय, ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले सलमान खानवर बरसला होता. ‘सलमान खान स्वत:ला काय समजतो. त्याच्यासारखे 100 सलमान गल्ली झाडायला उभे करतो,’ अशा शब्दांत त्याने आगपाखड केली होती. आता हाच बिचुकले ‘बिग बॉस 15’चा स्पर्धक करण कुंद्रावर (karan Kundrra) उलटला आहे. होय, करण कुंद्रा बेरोजगार आहे, म्हणत बिचुकलेने त्याला चक्क जॉब ऑफरही दिली आहे.

अभिजीत बिचुकलेने एक ट्विट करत करण कुंद्राची खिल्ली उडवली आहे. ‘प्रतिक, शमिता, तेजस्वी, उमर सगळे चांगले कलाकार तर बिझी आहे. ऐक, करण कुंद्रा माझ्या पेढ्याची जाहिरात करणार का? 150 रूपये देईल,’ असं त्याने ट्विट मध्ये म्हटलं आहे.

अभिजीत बिचुकले ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळल्यानंतर ‘बिग बॉस 15’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. बिग बॉसच्या घरात बिचुकलेने अनेकांशी पंगा घेतला. यामुळे सलमानने त्याचा अनेकदा क्लासही घेतला होता. वीकेंड का वारमध्ये सलमान बिचुकलेवर अनेकदा संतापला होता. ‘बिचुकले, तुम्ही घरात ज्या घाणेरड्या शिव्या देतात. जर त्याच शिव्या तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दिल्या तर कसं वाटेल? शेवटचं सांगतोय, जर पुन्हा असं झालं तर घरात येऊन तुला मारेन. इतकंच नाही तुझ्या केसांना पकडून घरातून फरफटत तुला बाहेर काढेन लक्षात ठेव,’ असं सलमान एका एपिसोडमध्ये म्हणाला होता. 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेकरण कुंद्राबिग बॉस