Join us

शहनाज गिलनंतर आता टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात सुरु आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 1:17 PM

शहनाजपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

'बिग बॉस'मुळे चर्चेत आलेली सर्वांची लाडकी शहनाज गिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले होते. तोच तिने रुग्णालयातून इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्या तब्येतीचे अपडेट दिले. शहनाजने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहन केलं. तसंच हे सगळं इन्फेक्शन झाल्यामुळे आहे अशीही माहिती दिली. शहनाजपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिग बॉस फेम जस्मिन भसीन(Jasmine Bhasin)ची ही प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

जस्मिनने आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना आपण रुग्णालयात असल्याचं सांगितलं. इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने बेडवर झोपलेला फोटो पोस्ट केला आहे. जस्मिनला पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे रु्गणलायात दाखल करण्याची वेळ आली आहे.  जस्मिनची ही पोस्ट पाहून  तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. पोटामध्ये इन्फेक्शन कशामुळे झालं? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन मोठ्या काळापासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. ना ती कोणत्या डेली सोपमध्ये आहे ना एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये. एखाद्या म्युझिक अल्बममध्येच तिला शेवटचं पाहिलं गेलं. मात्र ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असते. तसंच बॉयफ्रेंड अली गोनीसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत असते. जास्मीन भसीन आणि अली गोनी २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2021 मध्ये बिग बॉस 14 च्या घरात दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर घरातून बाहेर आल्यानंतरही ते रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. 

टॅग्स :जास्मीनहॉस्पिटल