Join us

Shocking प्रियंका जग्गानंतर बिग बॉसने केली स्वामी ओमची हकालपट्टी,वाचा नेमके काय घडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 4:05 PM

बिग बॉसच्या इतिहासात कधी नव्हे ते या सीजनमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. गेल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून वादग्रस्त ठरत असलेल्या प्रियंका जग्गा हिची सलमानने हकालपट्टी केल्यानंतर आता स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याला घराबाहेर काढले आहे. कॅप्टनशीपच्या टास्कमध्ये रोहनसोबत स्वामी ओमने घातलेली हुज्जत त्यांच्या चांगलीच अंगलट आली असून, नॉमिनेट न होताच त्यांची घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बिग बॉसच्या इतिहासात कधी नव्हे ते या सीजनमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. गेल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून वादग्रस्त ठरत असलेल्या प्रियंका जग्गा हिची सलमानने हकालपट्टी केल्यानंतर आता स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याला घराबाहेर काढले आहे. कॅप्टनशीपच्या टास्कमध्ये रोहनसोबत स्वामी ओमने घातलेली हुज्जत त्यांच्या चांगलीच अंगलट आली असून, नॉमिनेट न होताच त्यांची घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात शिवीगाळ, धक्काबुक्की, तोडफोड बघायला मिळाली. आता चक्क घरात मारामारी बघावयास मिळत असल्याने हा शो वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होय, हे खरं आहे. रोहन मेहराने घरातील सर्वांधिक वादग्रस्त सदस्य स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याच्यावर हात उचलला आहे. }}}} ">http://‘तुफान’ टास्कमध्ये फायनालिस्ट म्हणून मनवीर आणि रोहन यांच्यात कॅप्टनशिपचा सामना रंगला होता. दोघांनाही गार्डन एरियात उभारण्यात आलेल्या फडफील्डवर फ्लॉवर्स लावायचे होते. जो सदस्य सर्वाधिक फ्लॉवर्स लावणार तोच कॅप्टनशिपचा ताज मिळवणार होता. हा सामना दोघांमध्येच असल्याने घरातील अन्य सदस्यांचा यामध्ये कुठल्याच प्रकारचा रोल नव्हता. अशात स्वामी ओम त्याला डिस्टर्ब करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होते. त्याच्या कामात अडथळा आणण्यासाठी ते वारंवार त्याला डिवचत होते. स्वामी ओमच्या या करतुतींमुळे घरातील इतर सदस्य त्यांना मडफील्डपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. }}}} ">http://मात्र टास्क सुरू होताच स्वामी ओमने रोहनचे फ्लावर्स उघडून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. स्वामी ओमचा हा प्रताप बघून गौरव आणि बानी स्वामी ओमचा पाठलाग करून ते फ्लावर्स आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्वामी ओम त्यांनाही जुमानत नाहीत. अखेर संतापात रोहन स्वामी ओमच्या गालावर हात ठेवून त्यांना जोरात धक्का देतो. मात्र घरातील काही सदस्य याचा कांगावा करीत स्वामी ओमच्या बाजूने उभे राहतात. स्वामी ओम या संधीचा फायदा घेत लगेचच बिग बॉसकडे रोहनची तक्रार करतात. मला एका कानाने ऐकायला येत नाही, मला गंभीर दुखापत झाली असा दावा करीत ते रोहनला घरातून बाहेर काढा, अशी मागणी करतात. स्वामी ओमचा कांगावा बघून बिग बॉस त्यांच्या कानाची तपासणी करण्यासाठी त्यांना कन्फेशन रूममध्ये बोलावतात. }}}} ">http://या प्रकाराची दखल घेत बिग बॉस रोहनला संपूर्ण सीजनमध्ये नॉमिनेट राहण्याची शिक्षा ठोठावतात. बिग बॉसने दिलेल्या शिक्षेमुळे नाराज झालेला रोहन स्वत:ला बाथरूममध्ये बंद करतो. लोपामुद्रा त्याला बाथरूममधून बाहेर येण्यास सांगते, मात्र जोपर्यंत बिग बॉस न्याय करणार नाहीत तोपर्यंत घरातून बाहेर निघणार नसल्याचे तो सांगतो. आता रोहणच्या या पवित्र्यानंतर बिग बॉस काय निर्णय घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. मनवीरची इच्छा अखेर पूर्णकॅप्टनशीच्या टास्कमध्ये अखेरपर्यंत रेसमध्ये राहणारा मनवीर अखेर कॅप्टनशीपचा ताज मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. अतिशय अटीतटीच्या आणि वादग्रस्त ठरलेल्या टास्कमध्ये त्याने कॅप्टनशीपवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे घरात कॅप्टन होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याने आता तो कशा पद्धतीने घरात कॅप्टनशीप करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर रोहन आणि त्याच्यातील कोल्डवॉर रंगणार की आणखी दुसरे रूप धारण करणार हे बघणेदेखील प्रेक्षकांना औत्सुक्याचे ठरेल.