Join us

सिद्धार्थ चांदेकरनंतर आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीनं आपल्या आईचं थाटामाटात लावलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 3:25 PM

काही दिवसांपूर्वी मराठातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले होते. सिद्धार्थच्या कृत्याचे अनेकांनी प्रचंड कौतुक देखील केले होते. आता सिद्धार्थच्या पावलांवर पाऊल ठेवत अजून एका अभिनेत्रीने आपल्या आईची दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधून दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मराठातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले होते. सिद्धार्थच्या कृत्याचे अनेकांनी प्रचंड कौतुक देखील केले होते. आता सिद्धार्थच्या पावलांवर पाऊल ठेवत अजून एका अभिनेत्रीने आपल्या आईची दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधून दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अमृता फडके. या मालिकेत अमृता मानसी वहिनीच्या भूमिकेत दिसली होती.

अमृताची आई स्मिता फडके या देखील फिल्म इंडस्ट्रीशी निगडित असून  त्या एडिटिंग आणि कलरिस्ट म्हणून काम करतात.  शिवाय व्हीनस स्टुडिओ आणि स्वामी फिल्म्सच्या प्रॉपरायटर देखील आहेत. स्मिता शिरीष केळकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या आहेत. शिरीष केळकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. अमृताने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला लग्नाच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अमृताने आपल्या आई स्मिता फडके यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत लिहिले की, 'आई...., अभिनंदन ८.१२.२०२३ तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा, सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतेय. आणि तेही तुझ्या सेकंड इनिंगच्या टप्प्यावर! खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती. आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्पे नव्हतं, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे.'

पुढे तिने लिहिले, 'तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे. मनाने खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठ्या कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी खूप थँक यू. आई, या वयात, आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप गट्स लागतात. त्यासाठी खरेतर दोघांनाही हॅट्स ऑफ. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामीं चरणी प्रार्थना. खूप प्रेम.' त्यांच्यावर नेटकऱ्यांनीही लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अमृताच्या या पोस्ट खाली त्यांचे मित्रपरिवार चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत शिवाय अमृताचे कौतुक देखील करत आहे.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर