'अग्गंबाई सासूबाई' मालिकेला प्रचंड पसंती मिळाल्यानंतर या मालिकेचं दुसरं पर्व 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या रुपात बघायला मिळतंय. पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागाला हवी तशी पसंती रसिकांची मिळाली नाही. पण मालिकेतल्या कलाकारांचा दमदार अभिनयामुळेच रसिक आजही मालिकेला खिळून आहेत.
मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे निवेदिता सराफ यांनी साकारलेली आसावरी राजे या भूमिकेचा.मालिकेनंतर त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. त्यांच्या खर्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रसिकांना प्रचंड उत्सुकता असते.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्येही सर्वोक्तृष्ठ जोडीपैकी एक आहे. गेल्या चार दशकांपासून अशोक सराफ आपल्या दमदार अभिनयाने रसिकांचे मनोरंज करत आहेत. तर त्यांच्यसोबत पत्नी निवेदिता जोशी-सराफ मराठी सिनेमा गाजवल्यानंतर आता छोटा पडदा गाजवत आहेत.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ आई- वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात नाही तर वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये.अनिकेत सराफ एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे.
बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी स्वप्नपुर्ती केली असल्याचे निवेदिता सराफ यांनी सांगितले होते.