पुन्हा एकदा... दादांची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2016 7:52 AM
स्वर्गात दादांची धमाल नाव ऐकूणच गोंधळात पडलात ना ... अहो जास्त गोधंळात पडू नका... ...
स्वर्गात दादांची धमाल नाव ऐकूणच गोंधळात पडलात ना ... अहो जास्त गोधंळात पडू नका... दादा कोंडके यांच्यावर आधारीत पहिलं नाटक स्वर्गात दादांची धम्माल हे रंगभूमिवर प्रेक्षकांना हसवायला येत आहे. हे नाटक कल्पनारम्य नाटक असून, दादा हे स्वत: एक हसमूख स्वभागाचे होते. मरणोत्तर स्वर्गात गेल्यावर तीकडे ते कशा प्रकारे मज्जा करतील याचा विनोदी नजराणा प्रेक्षकांना या नाटकामधून पाहायला मिळणार आहे. या नाटक ात दादा कोंडके यांच्या १० गाजलेल्या गाण्यांवर तडाखेबंद नृत्याचे सादरीकरण सुद्धा केले जाणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विजय जोशी यांनी केले असून, या विनोदी नाटकाची संकल्पना व्यंकटेश गरूड यांची आहे. या नाटकामध्ये सुशील कुमार हे दादांच्या भुमिकेमध्ये दिसणार आहेत. तर भास्कर चांदणे, प्रसाद घाकूलकर, भगवान सूयर्वंशी, सागर सरदेसाई, माधवी, पंचशीला, प्रियंका, पद्मजा हे कलाकार सुद्धा मुख्य भुमिकेमध्ये दिसणार आहेत.